धारदार वस्तुने कपाळावर दुखापत ; इगतपुरीत एकावर गुन्हा दाखल

इगतपुरीनामा न्यूज – शनिवारी रात्री इगतपुरी शहरातील जोगेश्वरी नगर येथील सुशांत दत्तात्रय गायकवाड यांच्या घराजवळ संशयित आरोपी गौरव भोसले हा लघुशंका करत होता. सुशांत दत्तात्रय गायकवाड हे त्याला समजावुन सांगायला गेले. यावेळी गौरव भोसले याने त्यांना वाईटसाईट शिवीगाळ केली. त्याच्या खिशातील धारधार वस्तुने सुशांत दत्तात्रय गायकवाड यांच्या कपाळावर मारून आपखुशीने दुखापत केली. म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्यात सुशांत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गौरव भोसले याच्यावर गु. र. न. व कलम १७६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५१(२), (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

error: Content is protected !!