विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेचा महामार्गावर रास्तारोको

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, नवी मुंबई येथील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी येथे रास्तारोको करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावर शासनाच्या निषेर्धात लक्षवेधी आंदोलन करून तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून राज्य व केंद्र सरकार जातीय तेढा निर्माण करीत आहे. शासन आंबेडकरी विचाराच्या व तमाम बहुजनांच्या भावनेशी खेळत असल्याने महापुरूषांच्या नामकरणाला जाणीव पुर्वक प्रलंबीत ठेवले जात आहे. आता बहुजन वर्ग गप्प बसणार नाही तर रस्त्यावर उतरेल असे यावेळी दि. ना. उघाडे म्हणाले. येत्या १५ दिवसात दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामांतराबरोबरच प्रलंबित मागण्या पुर्ण केल्या नाही तर कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्यासह आघाडी सरकारच्या सबंधित मंत्री महोदयांना अखिल भारतीय आदिवासी सेनेसह आंबेडकर विचाराने प्रेरीत जनता घेराव घालुन जाब विचारल्या शिवाय रहाणार नाही असे निवेदनात नमुद आहे.

यावेळी शासनाच्या गलथान कारभाराच्या निषेर्धात घोषणा देत आंदोलकांनी लक्षवेधी निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांनी केले. याप्रसंगी भावना केदारे, अनुसया आगीवले, अनिल साळवे, राजु दोंदे, पंडित गांगुर्डे, संकेत निकाळे, सोमा आगीवले, आरवी जासवाल, सुमन वारघडे, नामदेव भडांगे, रूपेश जोशी, नितीन वालझाडे, शैला पगारे, मनिषा घुले, निता निरगुंडे, छाया गवळी, राणू गवळे, तावडे, नंदु उबाळे, मंगला पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!