गुन्हेगारी टोळक्याच्या आपसातील वादातूनच “त्या” युवकाचा खून : १ संशयित ताब्यात ; विविध संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक सक्रिय

घोटी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेकडून वेगाने झाली गुन्ह्याची उकल

अर्धवट जाळलेला मयत युवक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

वैतरणा धरण परिसरात अर्धवट जाळलेल्या युवकाची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलिसांना यश आले आहे. या घटनेतील खुन करून जाळणाऱ्या संशयित आरोपींचा ४८ तासात शोध घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने एका संशयित आरोपीला ताब्यात घेत उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके तयार केली आहे.

अधिक माहिती अशी की, या घटनेतील मयत युवक उजोद्धीन अफजल खान वय २३ रा. भारतनगर वडाळा नाशिक हा गुन्हेगारी स्वरूपाचा युवक असून त्याच्यावर नाशिक, इंदिरानगर, अंबड पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी स्वरूपाच्या टोळीतील आपसातील टोळीनेच मयत युवकाला सुरवातीला मुंबई व नाशिक येथे एकत्रित बसून मद्यपान केले. नंतर त्याच्या मानेवर तीष्ण हत्याराने वार करून खुन केल्यानंतर चारचाकीमधून वैतरणा धरण परिसरात प्लास्टिक गोणीत टाकून जाळण्यात आले. यावेळी मी मात्र त्यांच्या सोबत नव्हतो अशी माहिती अटक केलेल्या संशयित आरोपीने पोलिसांना दिली. या घटनेतील अनेक संशयित आरोपी युवकांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे. लवकरच सर्व गुन्हेगार पकडण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ह्या घटनेबाबत खात्रीशीर तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी दिली.

या घटनेमुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन व पोलीस पथकाने वेगाने फिरवलेले गतिमानचक्र यामुळे मयताचे धागेदोरे शोधण्यात पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेस यश आले. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना फडतारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक अनिल धुमसे यांसह हवालदार शितल गायकवाड, संतोष दोंदे, पंकज दराडे, हेमंत तुपलोंढे, बिपीन जगताप पथकात सहभागी होते. मयताचा पुरलेला मृतदेह त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आला.
                          

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!