
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
इगतपुरी तालुक्यातील वाघेरे सोसायटी निवडणुकीत मोहन भोर, सुखदेव भोर, बाळू भोर, विष्णू भोर, काळू भोर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवीत वर्चस्व सिद्ध केले. परिवर्तन पॅनलचे ११ संचालक निवडून आले होते. आज झालेल्या निवडणुकीत चेअरमनपदी मोहन श्रीराम भोर तर व्हॉइस चेअरमन म्हणून काळू शंकर भोर यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे. याप्रसंगी कांतीलाल भोर, दशरथ भोर, वसंत मांडे, बाळू भोर, लिलाबाई भोर, सुंदराबाई चौधरी, पुंजा भोर, रघुनाथ भोर, मच्छिंद्र गणाचार्य, केशव भोर, दर्शन भोर, सुखदेव भोर, विष्णू भोर, धनराज भोर, पोपट भोर, तानाजी भोर, विजय चिकने, ज्ञानेश्वर चिकने, उत्तम गायकर, बापूराव जाधव, सुनील भोर, लक्ष्मण भोर, रामहरी भोर आदी संचालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
गत महिन्यात ११ संचालक निवडून आमचा पॅनल विजयी झाला होता. ग्रामस्थांच्या सहकार्याने व विश्वासामुळे आज झालेल्या निवडणुकीत चेअरमनपदावर निवडून आलो. लोकांचा विश्वास सार्थक ठरवून कोणताही प्रकारचा तडा जाऊ न देता आम्ही काम करू अशी ग्वाही देतो.
- मोहन भोर, नवनिर्वाचित चेअरमन वाघेरे