
इगतपुरीनामा न्यूज – मुंढेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मॉडेल स्कूल अंतर्गत शिक्षण महोत्सव घेण्यात आला. स्टॉलचे उदघाटन मुंढेगावच्या सरपंच मंगल गतीर यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी भाषा विकास, विज्ञान विकास, शारीरिक विकास, इंग्रजी विकास, गणित विकास ह्या विषयावर आधारित स्वतः बनवलेल्या साहित्याचा वापर केला. घोटी केंद्र क्रमांक २ चे केंद्रप्रमुख राजेंद्र मोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पालकांची बैठक घेण्यात आली. आदर्श शाळा विकासाबाबत नरेंद्र सोनवणे यांनी माहिती दिली. सरला बच्छाव यांनी शाळेत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षणाच्या पायऱ्याची माहिती मालती धामणे यांनी दिली. मुख्याध्यापिका रेखा शेवाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल बागुल, विमल कुमावत, सुनंदा कंखर, ज्योती ठाकरे, हेमलता शेळके यांनी प्रयत्न केले.

