इगतपुरीचे वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांना  जीवनगौरव पुरस्कार प्रदान

इगतपुरीनामा न्यूज – मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था आणि महावीर इंटरनॅशनल नाशिक यांच्या वतीने २०२५ चा दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार इगतपुरीचे वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रमुख अतिथी डॉ. शेफाली भुजबळ, पोलीस निरीक्षक सुनील पवार, महंत भक्ती चरणदास महाराज, राम डावरे, विठ्ठलसिंग ठाकरे, मनू मानसी संस्थापिका अध्यक्ष  मेघाताई शिंपी, महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार, कार्याध्यक्ष मंजू जाखडी आदी मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे. भाऊसाहेब राव हे १९९९ पासून वनविभागात कार्यरत असून जीव धोक्यात घालून त्यांनी अनेक धाडसी कामे केली आहेत. वन्यजीव संरक्षण, वनतळे, जल, मृदु संधारण रोप वन, वृक्ष लागवड वन्यजीव जनजागृती, पशुधन नुकसान भरपाई मिळवून देणे आदी कामासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. वन्यप्राणी तस्कर यांना आळा घालुन फरार आरोपी यांना २४ तासात शोधुन आणुन जेरबंद करणारे वन परिमंडळ भाऊसाहेब राव यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!