नाशिक जिल्हा प्रवीण प्रशिक्षक कार्यकारिणी जाहीर : अध्यक्षपदी मीनाक्षी शेगावकर यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज – उपनगर नाशिक येथे महाराष्ट्र प्रवीण प्रशिक्षक संघटनेची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी नाशिक जिल्हा प्रवीण प्रशिक्षक कार्यकारणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती नवनिर्वाचित सल्लागार सदस्य कैलास चौधरी यांनी दिली. कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून मीनाक्षी शेगावकर, उपाध्यक्ष पल्लवी शिंदे, समन्वयक व जिल्हा कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, सचिव गणेश शिंदे, खजिनदार भारती जाधव ( सह कोषाध्यक्ष ), मनोज चिमनकर, प्रसिध्दीप्रमुख मनीषा महाजन, अशोक पगार, संघटन प्रमुख वैशाली कावळकर, सल्लागार सदस्य श्रावण देवरे, कैलास चौधरी, दिलीप निकम, महेश टोपले, प्रशांत पाटील, मीना साळवे, दिपाली पंडित, संजय गंगावणे, बापुराज खरे आदींची निवड करण्यात आली. त्यांचे सर्व क्षेत्रातुन अभिनंदन होत आहे. यावेळी नवनिर्वाचित सल्लागार सदस्य कैलास चौधरी यांनी यशदा प्रशिक्षण आणि प्रवीण प्रशिक्षण याबाबत समजावून सांगितले. दिलीप निकम यांनी प्रशिक्षकांच्या भूमिका स्पष्ट मताने व्यक्त केल्या.

Similar Posts

error: Content is protected !!