
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक परिक्षेत्रात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणणारे विजय शिंदे यांची घोटी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. टाकेद बुद्रुक जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात याबद्दल आनंद व्यक्त होत आहे. टाकेद भागातील सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, शेतकरी नेते नारायण राजेभोसले, राजेश जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश बांबळे, नंदू जाधव, गणेश दुर्गुडे, विजय जाधव, भगवान जुंद्रे, ललित मडके, रामचंद्र परदेशी यांनी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी टाकेद गटातील विविध विषयांवर चर्चा करून आगामी काळात अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी पोलिसांसोबत काम करण्याचा शब्द सर्वांनी दिला. पोलीस निरीक्षक शिंदे यांनी अमळनेर, जळगाव, अकोले तालुक्यातील राजूर, गडचिरोली, विक्रमगड, बोईसर येथे पोलीस निरीक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. घोटी पोलीस ठाण्याला पुन्हा एकदा चांगले पोलीस अधिकारी लाभल्याने सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे, शेतकरी नेते नारायण राजेभोसले, राजेश जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश बांबळे, नंदू जाधव, गणेश दुर्गुडे, विजय जाधव, भगवान जुंद्रे, ललित मडके, रामचंद्र परदेशी यांनी आनंद व्यक्त केला.