‘समृद्धी’ने अडवलेल्या पाण्यामुळे तळोघ येथील शेकडो शेतकऱ्यांच्या भातशेतीत घुसले पाणी : ठेकेदार फोन उचलीना अन प्रशासन लक्ष देईना ; शेतकरी चिंताग्रस्त

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

समृद्धी महामार्ग इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू  लागला आहे. पावसाळ्यापूर्वी लोकांना त्रास होईल अशी कामे पूर्ण करण्याऐवजी शेतकऱ्यांना त्रास व्हावा म्हणून काही कामे मुद्दाम केली जात नाहीत. समृद्धी महामार्गाचे काम सुरु असणाऱ्या तळोघ येथील नदीपात्रामध्ये संबंधित ठेकेदाराने आडवा बांध केलेला असल्याने साचलेले पाणी किमान १०० एकरातील भात शेतीत घुसले आहे. परिणामी ह्या सर्व शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला शेतकऱ्यांकडून गाऱ्हाणे मांडण्यासाठी संपर्क साधला जात आहे. मात्र भ्रमणध्वनी उचलला जात नसल्याने शेतकरी संतापले आहेत. इगतपुरी तालुक्यातील सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने अडवण्यात आलेले पाणी शेतांमध्ये घुसले आहे. यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण बांध तुटले आहेत. यामुळे क्षतीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मदन कडू आणि  शेतकऱ्यांनी केली आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी लक्ष घालणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. याबाबत शेतकऱ्यांना उध्वस्त केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. शेतकऱ्यांच्या संतापाचा अतिरेक होऊन आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!