
इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांच्या सुचनांनुसार पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पहिने भागातील नेकलेस धबधबा येथे वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे, सहाय्यक उपनिरीक्षक शिरीष मानकर, राजु कचरे, हवालदार भगवान खरोले, श्रीकांत दोंदे, शिरीष गांगुर्डे, विशाल बोराडे, विक्रम काकड, उल्हास धोंडगे व पोलीस मुख्यालयाकडील १५ अंमलदार असा बंदोबस्त लावण्यात आलेला होता. ह्या बंदोबस्ताच्या दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर विना हेल्मेट, ट्रिपल सीट, विना सीट बेल्ट, ड्रंक अँड ड्राईव्ह, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, रहदारीस अडथळा या कायद्याखाली ४५ केसेस करण्यात आल्या. यामध्ये एकुण ३१ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. यापुढेही पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी करण्याऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई सुरूच राहणार आहे. पर्यटकांनी शासनाच्या नियमांचे पालन करुनच पर्यटनाचा आनंद घेऊन शासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी केले आहे.