
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, शिवसेना गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा आज सकाळपासून शिरसाठे जिल्हा परिषद गटात गावभेटीद्वारे झंझावाती अभूतपूर्व प्रचारदौरा होत आहे. घड्याळ ही निवडणूक निशाणी सर्व मतदारांपर्यंत याधीच पोहोचली असून गाठीभेटी आणि शक्तीप्रदर्शन दाखवण्यात येत आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचाराची धुरा स्वतः मतदार हाती घेतात. शिरसाठे जिल्हा परिषद गटात आज सकाळी ९ पासून मोडाळे, शिरसाठे कुशेगाव, सांजेगाव, नांदडगाव, आहुर्ली, वांजोळे, म्हसुर्ली, सातूर्ली, ओंडली, नागोसली, धारगाव, आवळी, कऱ्होळे, रायांबे, कावनई, बिटूर्ली, वाकी, डहाळेवाडी, खंबाळे आणि रात्री साडेसात वाजता माणिकखांब ह्या गावांत गावभेट प्रचारदौरा होणार असल्याची माहिती देण्यात आली.