
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित व प्रतिष्ठेच्या पिंपळगाव मोर विविध कार्यकारी विकास सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी पंढरीनाथ काळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी रामनाथ बेंडकोळी यांची बिनविरोध निवड झाली. गत महिन्यात सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. ह्या दरम्यान विहित वेळेत चेअरमनपदासाठी पंढरीनाथ झुंगा काळे व व्हा. चेअरमनपदासाठी रामनाथ रघुनाथ बेंडकोळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने दोघंही पदाची बिनविरोध निवड झाल्याचे अर्चना सौंदाणे यांनी जाहीर केले. अधिकृत घोषणेनंतर उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट व घोषणा देण्यात आल्या. निवड प्रक्रियेत फत्तु बेंडकोळी, रघुनाथ कदम, अशोक काळे, हौशीराम काळे, रामदास विठोबा काळे, धनराज बेंडकोळी, रामदास संतू काळे, बाळू मेंगाळ, पार्वताबाई जाखेरे, यशोदा पिंगळे आदी संचालकांनी सहभाग घेतला. सहाय्यक म्हणून प्रशासक लक्ष्मण मुसळे, सचिव संजय शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी मोठ्या संख्येने संस्थचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. सभासदांनी नवनियुक्त संचालक मंडळावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून संस्थेचे चोख काम पाहणार आहोत. संस्था अनिष्ट तफावतीतुन कशी बाहेर काढता येईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल अशी प्रतिक्रिया नवनियुक्त चेअरमन पंढरीनाथ काळे यांनी दिली.