
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा गटसचिव व कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी निवडीची बैठक आज नाशिक येथे राज्य अध्यक्ष विश्वनाथ आबासाहेब निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये कार्यकारिणी निवडीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून विद्यमान जिल्हाध्यक्ष देविदास नाठे यांची पुन्हा सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सटाणा तालुका प्रतिनिधी प्रशांत सोनवणे व नाशिक तालुका प्रतिनिधी चंद्रकांत आवटे यांची निवड करण्यात आली. जनरल सेक्रेटरी म्हणून येवला तालुक्याचे प्रतिनिधी बाळासाहेब खोकले यांची निवड करण्यात आली. सहाय्यक जनरल सेक्रेटरीपदी निफाड तालुका प्रतिनिधी सुनील गोसावी यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी नाशिक तालुका प्रतिनिधी विलास पेखळे यांची निवड करण्यात आली. जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी मालेगाव तालुका प्रतिनिधी व राज्य अध्यक्ष विश्वनाथ निकम व नांदगाव तालुका प्रतिनिधी बाळासाहेब पवार यांची निवड करण्यात आली. राज्य संघटना प्रतिनिधी म्हणून मालेगाव तालुका प्रतिनिधी उमेश बोरसे, देवळा तालुका प्रतिनिधी जगन आहेर, विश्वनाथ निकम यांची निवड करण्यात आली. सर्व प्रतिनिधी निवड ही सर्वानुमते बिनविरोधपणे संपन्न झाली. सभेचे कामकाज आनंदाच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली..त्याबद्दल संघटनेचे विद्यमान अध्यक्ष देविदास नाठे यांनी सर्वांचे आभार मानले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य गट सचिव कर्मचारी संघटनेच्या वतीने मनापासून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.