आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी तालुक्यातील १ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुरु : २० फेब्रुवारीपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्यवस्थापन

इगतपुरीनामा न्यूज – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १२७ इगतपुरी (अ. ज. ) विधानसभा मतदारसंघ अंतर्गत इगतपुरी तालुक्यात ५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत मतदान केंद्रावर नियुक्त करावयाच्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सखोल प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शंका निरसन व्हाव्यात यासह मतदान यंत्रावरील प्रक्रिया व्यवस्थित समजण्यासाठी हे प्रशिक्षण सुरु आहे. आगामी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इगतपुरी विधानसभा मतदारसंघात इगतपुरी तालुक्यातील मतदान केंद्रावर नियुक्त करावयाच्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. त्यानुसार मतदान यंत्रावरील प्रशिक्षणासाठी नवीन प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय इगतपुरी येथे हॉल क्रमांक १ आणि २ मध्ये प्रशिक्षण नियोजन करण्यात आलेले आहे. ह्या प्रशिक्षणासाठी १ हजार अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तहसिल कार्यालयातील क्रमांक २ ह्या हॉलमध्ये सकाळ व दुपार सत्रात प्रत्येकी २ बॅचेस होत असून प्रत्येक सत्रात ५० कर्मचारी असे एका हॉलमध्ये दोन सत्रात १०० कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येईल. दोन हॉल मध्ये प्रतिदिन २०० कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन ठेवण्यात आले आहे अशी माहिती इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!