माझ्या शाळेची गोडी..

– माधुरी केवळराव पाटील
   जि. प. शाळा, मोडाळे
   ता. इगतपुरी जि. नाशिक
   संपर्क : 7588493260

शाळेची घंटा अनेक महिन्यांपासून वाजत नसल्याने शाळेची लागलेली ओढ ह्या कवितेतून प्रतीत होते. विद्यार्थ्यांच्या मनातल्या ओढीची ही कविता खास आपल्यासाठी…!

राहील का आई मला
शाळेची माझ्या गोडी
सगळंच झालं विसराया
तू मदत करशील थोडी.. !!१!!

नाही चित्र नाही ती होडी
खेळ नाही तो पळापळी
वर्ष झालं आहे बसून
नाही वाजली ती टाळी.. !!२!!

आठवण येते रोज मला
गोलात बसून जेवणाची
एकमेकात वाटून खातो
भात उसळ ती वरणाची.. !!३!!

मोठी सुट्टी लहान सुट्टी
कानी माझ्या पडली नाही
शाळेची ती साफसफाई
हातून माझ्या घडली नाही..  !!४!!
चार वाजता व्हायचा रोज
आवडीचा तो माझा तास
मज्जा मस्ती धमाल कुस्ती
आता झोपेत होतो भास.. !!५!!

कधी भेटतील गं सखे
गप्पा गोष्टी त्या करायला
कधी कट्टी तर कधी बट्टी
खोडी काढून भांडायला.. !!६!!

पाढे पाठ नसले तर
मिळत होती ती शिक्षा
शाळेत जाण्यासाठी रोज
वाट पाहते माझी रिक्षा.. !!६!!

Similar Posts

6 Comments

  1. avatar
    दिलीप गोसावी says:

    छान माधुरी मॅम.अप्रतिम सादरीकरण

  2. avatar
    गजानन says:

    प्रत्येक शिक्षकाच्या मनातील भावना

  3. avatar
    रोहिदास बापू होले . गोपाळवाडी ,दौंड ,पुणे. मो. ९०२८३४१५३६ says:

    अगदी खरंय कोरोनामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे शाळेची घंटा वाजत नाही, भितींवरचा फळा आपल्याशी बोलत नाही. सगळं कसं सुनं सुनं झालं आहे. देवा लवकरच पुन्हा शाळेचे दिवस पुर्ववत कर रे हीच प्रार्थना करतो. शाळेची धगधग कवयित्री माधुरी पाटील यांनी आपल्या कवितेतून केली आहे. शाळेच्या गमतीजमती पुन्हा सर्वाना अनुभवायला मिळू दे.

Leave a Reply

error: Content is protected !!