चंद्रकांत पाटील, स्वायत्त संस्थांबरोबर न्यायसंस्थाही तुमच्या खिशातच आहे का ? ; भुजबळांना धमकावल्या प्रकरणी पाटील यांच्यावर कारवाई करा ; शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वडघुले यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 4 : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने साम, दाम, दंड, भेद सर्व शक्ती वापरूनही ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता ताब्यात घेतली. भाजपचा धुव्वा उडाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना या पराभवामुळे शरमेने मान खाली घालावी लागली. भाजपचा दारुण पराभव जिव्हारी लागला असल्यानेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकचे विकासपुरुष पालकमंत्री छगन भुजबळ यांना द्वेषभावनेतून धमकावले. हा न्यायालयाचा अपमान असल्याचा आरोप आहे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या स्वायत्त संस्थांबरोबर न्यायसंस्थाही स्वतःच्या खिशात असल्याचा चंद्रकांत पाटील यांचा समज आहे का ? असा संतापजनक सवाल शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते इंजि. हंसराज वडघुले यांनी केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर न्यायालयाने सुमोटो कारवाई करावी, धमकावल्या याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार करत कठोर कारवाईची मागणी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची करून भाजपने दिग्गज नेते प्रचारासाठी उतरवले हाेते. शेकडो सभांचे आयोजन करून ममता बॅनर्जी यांचा पराभव होईल असे वातावरण निर्माण केले गेले होते. मात्र ममता बॅनर्जी यांनी धूळ चारत भाजपचा दारुण पराभव केला. हा पराभव भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या विजयाचे अभिनंदन जिल्ह्याचे पालकमंत्री विकासपुरुष छगन भुजबळ यांनी करून ममता बॅनर्जी यांची तुलना झाशीच्या  राणीशी केली हाेती. यामुळे चिडलेल्या चंद्रकांत पाटील यांनी निकालानंतर पराभवाची जबाबदारी न स्विकारता मंत्री भुजबळांना लक्ष्य केले. भुजबळ, तुम्ही जामिनावर सुटले आहेत तुम्हाला महागात पडेल असे धमकावले. यामुळे न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना असे धमकावणे गुन्हा आहे. म्हणून चंद्रकांत पाटील यांच्यावर न्यायालयाने सुमोटो कारवाई करावी अशी इंजि. वडघुले मागणी केली आहे.

भाजपाने राज्यात सत्ता असतांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. निफाड दौऱ्यावर असतांना आम्ही शेतकऱ्यांनी कांदे फेकून सभा उधळली होती. हे भाजपने अजिबात विसरता कामा नये. राज्यात जनआक्रोश आणि जनतेच्या मागण्या पूर्ण न केल्याने भाजपाला सत्तेपासून दूर रहावे लागले. सत्ता हातून गेल्यामुळेच अशा धमक्या देऊन सत्ता बळकावण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप इंजि. हंसराज वडघुले यांनी केला आहे.
पालकमंत्री भुजबळ यांनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात विकासाची गंगा आणली आहे. वेगवेगळे प्रकल्प आणत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वयाची पंच्याहत्तरी पार केली तरी कोरोना संकटकाळात तरुणाला लाजवेल अशी कामे विकासपुरुष भुजबळ करत आहेत. आडगाव कोव्हीड सेंटर, ऑक्सीजन निर्मितीसाठी अनेक ठिकाणी प्रकल्प, धान्याचा सुनियोजित पुरवठा, रात्रंदिवस कोरोनाशी लढा असे करत असतांना भुजबळांना धमकावून काहीही साध्य होणार नाही. याउलट ते सहीसलामत बाहेर येतील तसेच अशा पध्दतीने वेळोवेळी ईडी, सीबीआय बरोबर अटकेच्या धमक्या देणे हे योग्य नसल्याने तिखट प्रतिक्रिया उमटत असून राज्यभरातुन संतापाची लाट उसळली आहे.

भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी विकासपुरुष छगन भुजबळ यांना चुकीच्या पध्दतीने धमकावले. भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असतांना जबाबदार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना धमकावणे हा न्यायालयाचा अपमान आणि गुन्हा ठरत नाही का ? ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय या स्वायत्त संस्थांबरोबर न्यायसंस्थाही आमच्या खिशात आहे असा समज चंद्रकांत पाटील यांचा झाला आहे का ? पाटील हे मागच्या दाराने आलेले पुढारी आहेत तर विकासपुरुष भुजबळ हे लोकनियुक्त नेते आहेत. याची जाणीव चंद्रकांत पाटील तुम्हाला नाही का? न्यायालयाचा अपमान केल्या प्रकरणी पाटील यांच्यावर कारवाई करावी. याप्रकरणी न्यायालयाने सुमोटो कठोर कारवाई करावी. धमकी दिल्याप्रकरणी आम्ही गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडे तक्रार करून कठोर कारवाईची मागणी करणार आहोत.
इंजि. हंसराज वडघुले, राष्ट्रवादी नेते तथा, संस्थापक अध्यक्ष
शेतकरी संघर्ष संघटना

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!