उद्यापासून त्र्यंबकेश्वरमध्ये 7 दिवसाचा जनता कर्फ्यु ; नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
( सुनिल बोडके यांच्याकडून )

अवघ्या जगात दहशत माजवलेल्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर शहरामध्ये 7 दिवसाचा जनता कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. उद्या दि. 29 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू मध्ये सहभाग घ्यावा. शहरातील दुकाने, हॉटेल, लॉजिंग व इतर दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावीत असे आवाहन त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व उपनगराध्यक्ष सागर उजे यांनी त्र्यंबकवासीयांना केले आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर त्र्यंबकराज मंदिरामुळे नेहमी चर्चेत असते. भाविकांची गर्दी तसेच येथे चालणाऱ्या पूजा विधींमुळे देश परदेशातून येणार्‍या भाविकांची नेहमी गर्दी असते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. ते टाळण्यासाठी त्र्यंबक नगरपरिषदेने घेतलेल्या व्यापारी, उद्योजक तसेच नागरिक यांच्या बैठकीत 7 दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने घालून दिलेली नियमावली

१ ) औषध विक्री मेडिकल दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील.
२ ) दूध विक्री सकाळी सात ते नऊ कालावधीत करावी.
३ ) नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे लग्न, कार्यक्रम, समारंभ इत्यादी.
4 ) दुकानावर पेट्रोल पंप, बँक आदी ठिकाणी गर्दी करु नये.
5 ) कामाशिवाय घराबाहेर पडू नये
6 ) कुठल्याही प्रकारचा श्वसनाचा त्रास झाल्यास अशक्तपणा आल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात संपर्क साधावा.
7 ) होळीचा सण सार्वजनिकरित्या करू नये.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!