इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
आज २६ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ४० नव्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीं सापडल्या आहेत. आज अखेर एकंदरीत ३५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
घोटी ग्रामीण रुग्णालयात आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घेतले. घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गोरे यांनी सांगितले की, ह्या महामारीपासून बचावासाठी पात्र व्यक्तींनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लस सुरक्षित असल्यामुळेच नागरिक प्रतिसाद देत असल्याने आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेत लसीकरण करून घ्यावे.
बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी
■ काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडयाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत.
– बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी