
इगतपुरीनामा न्यूज – फौजदारी विषयात अत्यंत पारंगत असलेले इगतपुरी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दिलीप भागूजी खातळे यांना प्रहार सैनिक कल्याण संघातर्फे “इगतपुरीरत्न गौरव” पुरस्कार माजी सैनिकांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. जनतेच्या सेवेसाठी वकिली करणाऱ्या ॲड. खातळे यांच्या कार्याची दखल प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक विजय कातोरे यांनी घेतली. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे तालुकाभर अभिनंदन होत आहे. ॲड. दिलीप भागूजी खातळे यांचे बीकॉम एलएलबी पर्यंत नाशिकला शिक्षण झाले. १९९२ मध्ये त्यांचे वकिलीचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी ४ वर्ष नाशिक येथे जिल्हा न्यायालयात वकिली केली. सध्या ते इगतपुरी तालुक्यातील जनता व गोरगरिबांच्या सेवेसाठी इगतपुरी येथे वकिली करत आहे. ॲड. खातळे फौजदारी विषयात अत्यंत पारंगत असून अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. ३३ वर्षांपासून ते वकिली करत असून गेल्या तीन वर्षांपासून इगतपुरी वकील संघाचे अध्यक्षपद भूषवत आहे. त्यांनी इगतपुरी येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आणण्यासाठी प्रयत्न केले. उपविभागीय अधिकारी इगतपुरी यांचे कामकाज इगतपुरीत सुरु करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना “इगतपुरी रत्न गौरव” पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.