जनतेल्या परमेश्वराला “समाधान” देणारा त्र्यंबकेश्वरचा “टायगर”

लेखन : ज्ञानेश्वर महाले, पत्रकार

शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्र्यंबकेश्वर-हरसुल भागातील गोरगरिबांसाठी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षांपासून समाजकारणातुन राजकारण करणारे तमाम तरूणांचे आदरस्थान म्हणजे समाधान बोडके पाटील. आज त्यांचा आज वाढदिवस. वेळूंजे सारख्या खेड्यात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती हलाकीची. गरीब परिस्थितीत आपले शिक्षण झाल्यामुळे त्यांना गरिबीची जाण आहे. आपण सोसलेल्या गरिबीच्या झळा गोरगरिबांना बसू द्यायच्या नाही. त्यांचे मूलभूत हक्क मिळालेच पाहिजे यासाठी हातात लेखणी घेऊन त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रश्न शासन दरबारी पोहोचवून ते सोडवले.
 
विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि युवकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. यानिमित्ताने त्यांनी तालुक्यात आपली छाप उमटवली. गावी वयाच्या २१ व्या वर्षी सरपंच म्हणून त्यांनी मोठी जबाबदारी हाती घेतली. त्यांच्या कौशल्यदायी कार्याने तालुका शिवसेनेत या नेतृत्वाची जोरदार चर्चा होऊ लागली. निष्ठा, जिद्द, करारी बाणा, कणखर वक्तृत्व आणि तरूणाईवर भुरळ घालणारे हे व्यक्तिमत्त्व पक्षाने हेरले. त्यातून वयाच्या २१ वर्षी शिवसेनेने तालुक्याची सगळे सूत्रे समाधान पाटील बोडके यांच्या हाती सोपवले.
 
त्र्यंबकेश्वर तालुक्यात 15 वर्षापासुन सेनेचे नेतृत्व कोणाकडेही असो पण शिवसैनिकांचा मेळा मात्र सदैव समाधान बोडके पाटील यांच्या अवतीभवती असतो. शासनाच्या विविध योजना जनतेसाठी मिळुन देण्यास ते अग्रेसर असतात. ते अहोरात्र लोकापयोगी कामात गुंतलेले असतात. हरसूल सारख्या आदिवासी भागात तालुका पिंजून काढत शिवसेनेची पाळंमुळं घट्ट रोवली. त्या सोबत आपल्या लहान भावाला उच्चशिक्षण देऊन आदर्शपणे उभे केले. अंबोली धरणावर टायगर व्हॅली सारखे हॉटेल छोटेसे रोपटे लावले. आज त्याचे वटवृक्षात रुपांतर होऊन शेकडो खवय्ये त्याचा आस्वाद घेत आहे.
 
तालुक्यात त्यांचे अभ्यासू नेतृत्व फुलत जात असतांना गावपातळीवर अंबोली सोसायटी चेअरमन पद, वेळूंजे ग्रामपंचायतीत २ वेळा सरपंच, बीएसएनएल टेलिफोन सल्लागार समितीचे सदस्य, सह्याद्री वाचनालयाचे संस्थापक अशी अनेक पद भूषवली. अतिशय दुर्गम भागात बीएसएनएल सारखे नेटवर्क आणले. गावात वाचनालय उभारले. सामाजिक जाणिवेतून नेहमीच काही करण्याची उमेद बाळगुन प्रवाहाच्या विरोधात सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, दवाखान्यातील आर्थिक अडचणी स्वखर्चाने सोडवल्या. सामान्य लोकांचे प्रश्न प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समोर मांडले. आपल्या संभाषण कौशल्यातून लोकांच्या छोट्या मोठ्या प्रश्नांना जलदगतीने ते नेहमीच सोडवत असतात.

त्र्यंबकेश्वर ह्या दुर्गम आदिवासी तालुक्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कर्मचारी अधिकारी येऊन सेवा बजावतात. त्यांच इथे कोणी जवळचे नसतात. त्यामुळे अनेक कर्मचाऱी दडपणातून कामे करतात. अनेकदा बदलीचा मार्ग शोधतात. अशा प्रसंगी त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी जवळचा आधार वाटत असतात. त्यांना आपलं कोणीतरी आहे इथं हा विश्वास देणारे फक्त समाधान बोडके पाटील आहेत. प्रशासनात कोणी अडचणीत सापडलं अथवा कोणत्याही कर्मचारी अधिकारी वर्गाला गैरसमजुतीतून उगाच कोणी त्रास देत असेल तिथे समाधान बोडके पाटील मार्ग काढणारच असा अलिखित नियम आहे.

त्यांनी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, सभापती व शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या माध्यमातून शेकडो विकासकामे वेळुंजे गावात केली. १५ वर्षापुर्वी गावात पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर नळ पाणीपुरवठा योजना राबवली. स्मशानभूमी तालुक्यात सर्वसुख सोयीयुक्त माॅडेल बनवली. आरोग्य उपकेंद्र मंजूर करून इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. गावात आणि शिवारात वाडी वस्तीवर प्रत्येक घरात वीज, दिडशे विजेचे खांब आणि सहा ट्रान्स्फॉर्मर बसवून घेतले. प्रत्येक वस्तीमध्ये स्वतंत्र सामाजिक सभागृह, सभामंडप, व्यायाम शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, संपूर्ण गावात सिमेंट रस्ते, शिवार रस्ते, फिल्टर प्लांट, अंगणवाड्या, शाळा इमारती पुर्ण केल्या. परिसरातील रोजगार निर्मिती म्हणुन पन्नास पेक्षा अधिक युवकांना ड्रायव्हर केले. हाॅटेल व इतर व्यवसायातून गावातील व परिसरातील पंचवीस ते चाळीस मुलं महिलांना रोजचा रोजगार निर्माण केला.

बाळासाहेबांच्या आशिर्वादासह शिवसैनिकांच्या निष्ठेवर आगामी काळ शिवसेनेचाच असेल असे ठामपणे म्हणणारे समाधान बोडके पाटील यांच्या आत्मविश्वासाला सलाम. गोरगरीब सामान्य नागरिकांचा कैवारी आणि कट्टर शिवसैनिकास मानाचा मुजरा अन वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!