
इगतपुरीनामा न्यूज – छावाचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचे विश्वासू सहकारी गोकुळ धोंगडे यांची छावा क्रांतिवीर सेनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा वर्णी लागली आहे. संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेशाध्यक्ष शिवाजीराजे मोरे, जिल्हाध्यक्ष आशिष हिरे आदींच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. गोकुळ धोंगडे गेल्या १५ वर्षापासून छावा संघटनेद्वारे विविध सामाजिक कामे करतात. गोरगरिबांसाठी त्यांनी अनेक उपक्रम यशस्वी केले आहेट. स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी ते कायम आघाडीवर असतात. छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून सुरु केलेले सामाजिक काम निरंतर करेल. तिसऱ्यांदा निवड झाल्याने माझी जबाबदारी अजुन वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत छावाची ताकद दाखवून देण्यासाठी बांधील आहे असे गोकुळ धोंगडे म्हणाले. याप्रसंगी नवनाथ शिंदे, शिवा तेलंग, नारायण जाधव, योगेश गांगुर्डे, भरत पिंगळे, सखाराम गव्हाणे, किरण डोखे, अविनाश गायकर, शुभम महाले, अमोल धोंगडे, योगेश धोंगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.