महायुतीतर्फे आमदार हिरामण खोसकर यांनी शक्तिप्रदर्शन करीत केला उमेदवारी अर्ज दाखल

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार इगतपुरीचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आमदार खोसकर यांच्यावरील जनतेचा विश्वास आणि वाढवलेला जनसंपर्क पाहता इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार हिरामण खोसकर विजयी होतीत असा विश्वास यावेळी समर्थकांनी व्यक्त केला. अर्ज दाखल करतांना भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, माजी खासदार हेमंत गोडसे, ॲड. संदीप गुळवे, जनार्दन माळी हे श्री. खोसकर यांच्या सोबत होते. इगतपुरी विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. खोसकर यांनी शक्तीप्रदर्शन करीत आज नाशिक येथील इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ओमकार पवार यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीतील पदाधिकारी, दोन्ही तालुक्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Similar Posts

error: Content is protected !!