
इगतपुरीनामा न्यूज – आळंदी पोलीस ठाण्यात ३ अल्पवयीन मुलींचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाल्याचा गुन्हा २५ फेब्रुवारीला दाखल आहे. यानुसार अपहरण झालेल्या तिन्ही मुली इगतपुरी शहरांत वास्तव्याला असल्याची माहिती आळंदीचे पोलीस उपनिरीक्षक के. के गिरीगोसावी आणि त्यांच्या पथकाला समजले. त्यांनी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांना कळवली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा, उपनिरीक्षक संदिप शिंदे, पोलीस कृष्णा गोडसे, अभिजित पोर्टिदे, दिपक पटेकर, निलेश काजळे, पुजा डावखर, योगेश भावनाथ यांनी इगतपुरी शहरात जुनी उर्दु शाळा गोळीबार मैदान भागात अपहरण झालेल्या ३ मुलींचा शोध घेऊन त्यांना आळंदी पोलिसांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले. इगतपुरी पोलिसांच्या कामगिरीचे आळंदी पोलिसांसह इगतपुरी तालुक्यात कौतुक करण्यात आले.