
इगतपुरीनामा न्यूज – छत्रपती शिवरायांचे विचार व्याख्यानाद्वारे पोहचविण्याचे महत्वपूर्ण काम करणारी जानोरीची बाल शिवचरित्रकार कु. प्रतीक्षा एकनाथ बोराडे हिला मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा ‘कन्यारत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेच्या संस्थापक मेघाताई शिंपी यांनी याबाबत आज घोषणा केली. कु. प्रतीक्षा बोराडे हिचे या पुरस्काराबाबत अभिनंदन होत आहे. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने ९ मार्चला श्री कालिका देवी मंदिर ट्रस्ट हॉल जुना आग्रा रोड नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते कु. प्रतीक्षाला सन्मानपूर्वक पुरस्काराचे वितरण करण्यात आहे. तपोनिधी प.पू. संत सद्गुरू श्री स्वामी अक्षय महाराज यांच्या आशीर्वादाने कु. प्रतीक्षा पाचवीपासून वारकरी शिक्षण घेते. तिची आई शीतल यांनी तिला शिवविचारांनी संस्कारित केले आहे. आता सध्या दहावीत शिकत असलेल्या प्रतिक्षाला हभप पंढरीनाथ महाराज सहाणे यांनी वारकरी शिक्षण दिले आहे. कन्या गुरुकुलच्या गुरुवर्य हभप उन्नती बेलुकर, महाराष्ट्र भूषण पखवाजवादक हभप विकास महाराज बेलुकर, हभप कैलास महाराज तांबे, वडील एकनाथ बोराडे, मामा समाधान, गणेश, संदिप सूर्यवंशी यांचे तिला मार्गदर्शन मिळते.