राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न : सामाजिक क्षेत्रात योगेश निसाळ यांचे काम  उल्लेखनीय – ना. भुजबळ

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत्या काळात तरुणांना मोठी संधी दिली जाणार आहे. राजकीय क्षेत्रात नवतरुण आल्यास समाजाचा मोठा कायापालट होईल. सामाजिक क्षेत्रात योगेश निसाळ यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे कौतुक कॅबिनेट मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस योगेश निसाळ यांचा वाढदिवस ना. छगनराव भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुजबळ फार्म येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एमईटी संचालिका डॉ. शेफाली भुजबळ, बाळासाहेब कर्डक, रविंद्र नाना पगार, रंजन ठाकरे, अंबादास खैरे, विष्णुपंत म्हैसधुणे, समाधान जेजुरकर, कैलास अण्णा मुदलियार, शशी हिरवे, वजाहत शेख, आकाश पगार, सचिन जगझाप, अरुण थोरात, भालचंद्र भुजबळ,सचिन बिडकर, नाना साबळे, राहुल घोडे, प्रफुल्ल पाटील आदी पदाधिकारी व समता सैनिक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!