इगतपुरीनामा न्यूज – सिन्नरचे बेपत्ता असलेले मुकुंद पुरुषोत्तम सारडा यांचा मृतदेह इगतपुरीजवळ फॉग सिटीच्या मागील बाजुला आढळला आहे. मुकुंद सारडा शुक्रवारी १२ एप्रिलला घरून दुकानात जातो सांगुन गेले मात्र ते दुकानात गेलेच नाही. दुसऱ्या दिवशीही घरी पोहचले नाही. कुटुंबियांनी नातेवाईकांकडे विचारपुस करूनही ते कोठेही आढळले नाही. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल आहे. आज गुरुवारी इगतपुरी पोलिसांना कथ्रूवंगनवाडी येथे अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांना हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. इगतपुरी पोलिसांनी जागीच शवविश्चेदन करून पंचनामा केला. ह्या इसमाने कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group