
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
हरसूल आणि परिसरात विविध ठिकाणी रस्त्यांच्या विकासकामांचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, भारती भोये, माजी सभापती सुनंदा भोये यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलतांना आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले की, हरसूल भागांत अनेक रस्ते खड्डेमय झाले असून संबंधित विभाग अजूनही सुस्तच बसला आहे. नव्याने होत असलेल्या रस्त्यांची गुणवत्ता ही सकारत्मक ठेवून रस्ते सुसज्ज आणि चांगले गुणवत्तापूर्ण झाले नाहीत तर त्यास संबंधित विभागासह ठेकेदाराला दोषी ठरविण्यात येईल. सज्जड इशारा देत निकृष्ट दर्जाचे रस्ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा आमदार हिरामण खोसकर यांनी यावेळी दिला.
हरसूल भागाचा कायापालट आणि कटिबद्धतेसाठी प्रयन्तशील असल्याचे प्रतिपादन यावेळी खोसकर यांनी केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे पेठ, तोरंगण, हरसूल, वाघेरा, आंबोली, त्र्यंबकेश्वर, घोटी ( रामा )२३ किमी सुधारणा ( हरसूल गावातील लांबीचे चौपदरीकरण करणे ),आडगाव, गिरणारे, वाघेरा, हरसूल, ओझरखेड रस्ता ( रामा ) आदी रस्त्यांच्या कामांचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, उपसरपंच राहुल शार्दूल, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष भारती खिरारी, मिथुन राऊत, नितीन देवरगावकर, विठ्ठल भोये, गोकुळ बत्तासे, वामन खरपडे, गावीत, अशोक लांघे, गोपाळ महाले, नामदेव महाले, अधिकारी, ठेकेदार आदींसह मान्यवर उपस्थित होते.