रचना : माधुरी केवळराव पाटील
प्राथमिक शिक्षिका, मोडाळे
ता. इगतपुरी, जि. नाशिक
संपर्क : 7588493260
थांबव ना देवा आता
थरार नाट्य हे तुझे
हाक ऐक ना तू माझी
उपकार मानीन रे तुझे.. !!१!!
नाही मिळत तो प्लाझ्मा
तुटवडा आहे प्राणवायूचा
लुटमार रेमडेसिवीरचा
कसा वाचवू जीव पेशंटचा.. !!२!!
डोळ्या देखत गळून पडले
हिरे त्या सोन माळेतील
नाही बघवत सारे आता
हाल व्यक्तींचे कुटुंबातील.. !!३!!
किती घेशील देवा परीक्षा
आता तू या मानवाची
अंत्यसंस्कारला सुद्धा वेटींग
हेळसांड पुन्हा त्या देहाची.. !!४!!
डॉक्टर, नर्स आणि पोलीस
थकले सारे आता बिचारे
जेवणासाठी वाट पाहतात
कुटुंबातील त्यांच्या सारे.. !!५!!
थांबव काळा बाजार आता
प्लाझ्मा, रेमडेसिवीरचा
जगत आहात तुम्ही महाराष्ट्रात
मावळा छत्रपती शिवरायांचा.. !!६!!
दया कर हे करुणाकरा
हाल नको त्या मानवाचे
विनंती करते हात जोडूनी
वारे जाऊदे हे कोरोनाचे.. !!७!!
( कवयित्री माधुरी पाटील मोडाळे ता. इगतपुरी येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. )