इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ ( सुनिल बोडके, त्र्यंबकेश्वर )
त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर मधील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे उपजिल्हा रुग्णालय आहे. ह्या रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी शिवसेना तालुका समनव्यक वेळुंजे येथील रुग्णसेवक समाधान बोडके पाटील यांची निवड झाली आहे. बोडके पाटील यांचा तालुक्यातील जनसंपर्क तसेच अहोरात्र केलेली रुग्णांची सेवा त्याचे बक्षीस म्हणून महत्त्वाचे समजले जाणारे सदस्य पद मिळायची माहिती रूग्ण कल्याण समितीने दिली.
त्यांच्या निवडीने ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून रुग्णांची होणारी हेळसांड थांबणार आहे. बोडके यांनी तालुक्यातील रुग्णांची सेवा करत स्वतःच्या गाडीने शेकडो रुग्णांना स्वखर्चाने रुग्णालयात पाठवलेले आहे.
खासदार, जि. प. सदस्य, पंचायत समिती सभापती यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून महत्त्वाचे कामे करणार असल्याचे बोडके म्हणाले. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे सभापती मोतीराम दिवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, शिवसेना नेते रामनाथ बोडके, अखिल भारतीय वारकरी सांप्रदायाचे तालुकाध्यक्ष शिवाजी कसबे, उमेश सोनवणे, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष रावसाहेब कोठुळे, तानाजी कड, रंगनाथ मिंदे, युवासेना तालुका प्रमुख संदीप चव्हाण, योगेश बोडके आदी उपस्थित होते.
■ गेल्या २२ वर्षांपासून रूग्णसेवा करण्याची परमेश्वराने संधी उपलब्ध करून दिली. स्व:ताचे वाहन रुग्णवाहिका समजून त्यामाधव गोरगरीब रुग्णांना हाॅस्पीटल पर्यंत पोहोचवले. त्यामुळे रूग्णांचे प्राण वाचवण्याचे भाग्य लाभले. अनेक अपघातग्रस्तांना मदत केली. अनेकांची वेगवेगळ्या योजनांमधून आवश्यक ऑपरेशन करून दिले. मुंबई पर्यंत जाऊन अनेक रूग्णांना मदत करता करता आज माझ्या आवडीच्या क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाच्या रूग्ण कल्याण समितीवर माझी सदस्य पदी नियुक्ती झाल्याचा मनस्वी आनंद होतोय.
– समाधान बोडके पाटील, रुग्णमित्र
Comments