इगतपुरी तालुक्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले

इगतपुरीनामा न्यूज, दि. २
इगतपुरी तालुक्यातील कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले असून आज दिलासादायक बातमी आली आहे. तब्बल ४५ जणांनी आज एकाच दिवशी कोरोनावर मात केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार ३९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. आज दिवस अखेर ३३९ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.

इगतपुरी, घोटी ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बहुतांश उपकेंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम उद्यापासून वेग घेणार असल्याचे समजते. निर्बंधांचे पालन, आहार व्यवस्थापन आणि वैद्यकीय सल्ल्याने कोरोनापासून बचाव करता येतो. मात्र यांच्यासोबत कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुद्धा करणे आवश्यक असल्याचे मत इगतपुरी ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांनी व्यक्त केले.

काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडयाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत.
बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी

कोरोना लसीकरण पूर्णतः सुरक्षित आहे, पात्र लाभार्थ्यांनी जरूर लसीकरण करून घ्यावे हे आवाहन करतांना सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. चैतन्य बागुल यांचा व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा 👇

https://igatpurinama.in/archives/1665