नाभिक बांधवांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी झटणारे एकनाथ शिंदे

– अँड. सुनिल कोरडे, इगतपुरी

नाभिक बांधवांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी झटणारे एकनाथ शिंदे

सरकारने आणि समाजाने नेहमीच प्रवाहाबाहेर ढकललेल्या, मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवलेल्या व गरिबीचा जन्मजात शिक्का मारलेल्या अन्यायग्रस्त नाभिक बांधवांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी श्री. एकनाथ पोपट शिंदे हा उमदा युवक झटत आहे. नाभिकांना संघटित करणं, त्यांच्या शाश्वत रोजगारासाठी भटकणं, नाभिकांची पुढची पिढी भक्कम घडवण्यासाठी कृतीबद्ध नियोजन करणं आदींमधील त्यांची कृतीशीलता लक्षणीय आहे. नाशिक जिल्हा सलून असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यापासून एकनाथ शिंदे अनेकांचा नाथ झाला आहे. सातत्याने पायाला भिंगरी लावून जिल्हाभर नाभिक बांधवांचे संघटन आणि जागृती करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. यामध्ये त्याच्याबरोबर हातात हात घेऊन काम करणारे अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या सोबत काम करतांना दिसल्यावर नाभिक समाजाला उज्वल दिवस आणण्यात हा युवक निश्चितच यशस्वी होऊ शकतो. १९ मार्च हा एकनाथ शिंदे यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याबाबत घेतलेला हा संक्षिप्त आढावा.
पिंपळगाव घाडगा येथील श्री. पोपट कचरू शिंदे, कै. भीमाबाई पोपट शिंदे यांच्या कुटुंबात एकनाथ शिंदे यांचा जन्म झाला. जन्मतः एकवेळ जेवणाची भ्रांत असलेले हे नाभिक कुटुंब. कुटुंबातील सदस्यांची व्याप्ती पाहता प्रचंड मोठे असणाऱ्या कुटुंबासाठी वडिलांनी अतोनात कष्ट केले. लहानपणापासून गरिबीचे चटके सहन करता करता एकनाथ हळूहळू मोठा होत होता. नाभिक समाजाला नेमके काय सोसावे लागते ? इतर समाजाचा नाभिकांकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन काय ? नाभिक कुटुंब पुढं जाण्यासाठी नेमकं काय करावं लागेल ? नाभिकांच्या अवनत अवस्थेला जबाबदार कोण ? ह्या प्रश्नांचे कोडे लहानपणापासून एकनाथला पडत होते. मामा पत्रकार भास्कर सोनवणे यांच्याशी या अनेक विषयांवर तो चर्चा करीत असे. मामांनी सांगितले की समाज पुढे न्यायचा असेल तर प्रथमतः स्वतः सक्षम होऊन आपलं मूल्य वाढवलं पाहिजे. ह्या नितीमूल्यांतून नाभिक समाज पुढं नेण्यासाठी भक्कमपणे वाटचाल करता येईल. मामांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून एकनाथने आपलं कुटुंब पुढं नेऊन क्रांतीची सुरुवात स्वतःपासून करायचा निश्चय केला. त्यानुसार मामांच्या मार्गदर्शनातून पंचायत समितीच्या सुवर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेतून इंडियन बँक पिंपळगाव घाडगा शाखेतून सलून दुकानासाठी २८ हजारांचे कर्ज घेतले. हे कर्ज घेण्यासाठी नाना प्रकारच्या अडचणींना सामोरे तर जावे लागलेच पण सलुनच्या टपरीसाठी लागणाऱ्या जागेसाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक स्वतःचा नाभिक व्यवसाय नावारूपाला आणला. स्वतःच्या शिंदे परिवाराचे अस्तित्व लोकांमध्ये नावारूपाला आणले. हळूहळू व्यवसायाचा सुद्धा विविध गावांत विस्तार केला.
शासकीय योजनेतून हक्काचे घरकुल मिळवुन त्यामध्ये पदरमोड करून उत्तमपणे घराचे स्वप्न सुद्धा पूर्ण केले.
छोटे मामा पत्रकार लक्ष्मण सोनवणे यांच्या सानिध्यातून दैनिक पुण्यनगरी ह्या लोकप्रिय दैनिकासाठी पत्रकारिता पण सुरू केली. संपूर्ण कुटुंबातील महत्वाच्या जबाबदाऱ्या सुद्धा अत्यंत खुबीने पार पाडल्या. बहिणींचे लग्न तर इतक्या डौलात केले की सर्व लोकांनी तोंडात बोटे घातली. आता सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्याने आणि प्रथम कुटुंब सक्षम केल्यानंतर न्यायापासून वंचित असलेल्या नाभिक समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी लगेचच नाशिक जिल्हा सलून असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष पदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले. नियुक्तीनंतर लगेचच कामाला सुरुवात केली. निवडीच्या आधीच जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, नयना गावित यांच्यामार्फत नाभिक बांधवांना मोफत खुर्च्या मिळवून दिल्या असल्याने ते लोकप्रिय झालेले होते. नियुक्तीनंतर नाभिक युवकांना विविध बँकांतून व्यवसायासाठी कर्ज मिळवून देऊन स्वतः सक्षम व्हा असा संदेश दिला. नाभिकांच्या अन्याय अत्याचारावर आवाज उठवण्यात आणि समाजाच्या आर्थिक समृद्धीसाठी एकनाथ शिंदे सतत कार्यरत आहे. यामध्ये बहुतांशी यश सुद्धा मिळाले आहे. नाभिक समाजाच्या शाश्वत रोजगारासाठी भटकणं, नाभिकांची पुढची पिढी भक्कम घडवण्यासाठी कृतीबद्ध नियोजन करणं आदींमधील त्यांची कृतीशीलता कायमच दिसून आलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबाबत लिहायला ह्या लेखात शब्द कमी पडतील इतकं त्यांचं काम निष्ठेने सुरू आहे. एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात की, “कितीही संकटे आली तरी संकटांच्या ढिगाऱ्यावर उभा राहून मी माझ्या समाजाची सेवा करणारच. मी माझ्या समाजाला उन्नत आणि समृद्ध जीवन अनुभवण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मला फक्त आपल्या सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत, बाकी काही नको.”
असे ध्येयवेडे आणि नाभिक बांधवांची शान नाशिक जिल्हा सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा…!

शुभेच्छुक :अँड. सुनिल कोरडे, इगतपुरी 9822446606

श्री. एकनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष नाशिक जिल्हा सलून असोसिएशन

Similar Posts

Comments

  1. avatar
    Buchude Harshad says:

    खुप छान. वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा अध्यक्ष साहेब।

Leave a Reply

error: Content is protected !!