इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात आज आग लागण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दोन्हीही घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहिल्या घटनेत मध्यरात्रीच्या सुमाराला घोटी सिन्नर महामार्गावरील पिंपळगाव मोर येथे कॉइल घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतला. शॉर्टसर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला लावला. या घटनेत ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर टोल नाका व इगतपुरी अग्निशमन दलाने ट्रकची आग आटोक्यात आणली. दुसऱ्या घटनेत आज सकाळी ७ वाजता इगतपुरी शहरातील खालची पेठ परिसरातील कय्युम शेख यांच्या भंगार व सायकलच्या दुकानाला आग लागली. ह्या आगीत दुकानातील सायकली व टायर जळून खाक झाले. स्थानिक नागरिक आणि इगतपुरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. ह्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group