इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या इगतपुरी तालुका उपाध्यक्षपदी दशरथ जमधडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी आज त्यांच्या निवडीची घोषणा केली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांचे खंदे समर्थक म्हणून दशरथ जमधडे इगतपुरी तालुक्यात प्रसिद्ध आहेत. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, इगतपुरी तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, डॉ. महेंद्र शिरसाठ यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. दशरथ जमधडे यांच्या निवडीचे इगतपुरी तालुक्यात स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय कार्यकर्ते असणारे दशरथ जमधडे यांच्याकडे मजबूत संघटन असून इगतपुरी तालुक्यातील विविध क्षेत्रात दांडगा संपर्क आहे. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडीबद्दल विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाप्रसंगी दशरथ जमधडे म्हणाले की, प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य केल्याने माझी तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवून पक्षासाठी मजबूत संघटन उभे करणार आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group