पत्नीशी प्रेमसंबंधाचा राग अनावर झाल्याने दोघांकडून एकाचा खून : वाडीवऱ्हे पोलिसांकडून २ संशयितांना अटक

इगतपुरीनामा न्यूज – संपत मधु मुकणे रा. जोगलवाडी ता. मोखाडा जि. पालघर ह. रा. वांगेवाडी घोटी याचे वीटभट्टी कामावरील शंकर रतन वळवी याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. ते दोघे प्रेमीयुगुल ९ एप्रिलला वीटभट्टीवरून पळुन गेले होते. याचा राग मनात धरुन बुधा रतन वळवी, शंकर रतन वळवी यांनी लाथाबुक्यांनी संपत मुकणे याला बेदम मारहाण करुन त्याला जीवे ठार मारले. ही घटना १५ एप्रिलला रात्रीच्या वेळी घडली आहे. संपतचे प्रेत गरुडेश्वर शिवारात मुंढेगाव ते अस्वली जाणारे रोडलगत मरीमाता मंदिरा लगत फेकुन देवुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. म्हणुन मयताची आई शांताबाई मधु मुकणे वय ५५ रा. जोगलवाडी ता. मोखाडा जि. पालघर ह. रा. अरुण अष्टेकर यांची विट भट्टी, वांगेवाडी घोटी ता. इगतपुरी यांच्या तक्रारीवरुन बुधा रतन वळवी, शंकर रतन वळवी या दोघांविरुध्द वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०१, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास नशोक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे, पी. जी. गायकवाड आदी करीत आहेत.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!