
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील ज्ञानदा माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार एज्युमीट अकॅडमी द्वारा घेण्यात येणारी भारत टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न झाली. वाडीवऱ्हे, मोडाळे, सांजेगाव, भावली खुर्द, आडवण प्राथमिक व माध्यमिक शाळेतील पहिली ते आठवीच्या २५४ विद्यार्थ्यांनी भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा दिली. अतिशय खेळीमेळीच्या व नियोजनबद्ध वातावरणात ही परीक्षा संपन्न झाली. या परीक्षेसाठी केंद्रसंचालक म्हणून ज्ञानदा शाळेचे मुख्याध्यापक जगदीश मोरे, तालुका समन्वयक माधुरी पाटील यांनी काम पाहिले. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. प्रवीण भडांगे, दिपक घोलप उत्तम साठे, विश्वनाथ पोटिंगे, अमोल धात्रक आदित्य शेंडगे, कृष्णा शेंडगे, महेश मेदडे, विकास गोऱ्हे, रोशन कान्हव, हर्षद धोंगडे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम केले. गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, केंद्रप्रमुख वसुंधरा इगवे, मुख्याध्यापिका चंद्रभागा तुपे आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. परीक्षा यशस्वीतेसाठी प्रकाश शेवाळे, सुनीता सोनवणे, अतुल आहिरे, रोहिणी पगार, नामदेव धात्रक यांनी परिश्रम घेतले.