पिंपळगाव डुकरा येथे मायलेकींचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

एकनाथ शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे विहिरीत बुडून कर्जत तालुक्यातील ताजु येथील मेंढपाळ मायलेकींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पिंपळगाव डुकरा येथील शेतकरी अरुण शंकर भगत यांच्या शेतातीलविहीरीत आज दुपारी मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी  गेलेल्या पपाबाई राजेंद्र गोयकर वय 35, मोनिका राजेंद्र गोयकर 15 वर्षे ह्या दोघी मायलेकींचा बुडून मृत्यू झाला.

मोनिकाचा पाय घसरुन ती पाण्यात पडली तिला वाचवण्यासाठी आई पपाबाई गेली असताना तिचाही बुडून मृत्यू झाला. तिच्या मुलाने सर्व बघितल्याने त्याने गावातील लोकांना मदतीसाठी बोलावले. माजी पोलीस पाटील कचरू वाकचौरे यांनी तात्काळ वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला कळवले.  यावेळी पोलीस हवालदार विलास धरणकर यांनी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गोविंद तुपे यांना बुडालेले मृतदेह काढण्यासाठी  बोलवले.  त्यांनी पाण्याचा अंदाज घेऊन मायलेकीचे मृतदेह विहिरीतुन बाहेर काढले. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मायलेकीचे मृतदेह घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी पोलीस राजु पाटील, विलास धारणकर, मौले आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!