
इगतपुरीनामा न्यूज – सिन्नर येथील व्ही. एन. नाईक महाविद्यालयात नुकत्याच आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. ह्या स्पर्धेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाने यश मिळवले. द्वितीय वर्ष कला वर्गातील पूजा पांडुरंग बिन्नर हिने ५३ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला. नाशिकच्या केबीटी इंजिनीअरिंग महाविद्यालयातील शरीर सौष्ठव स्पर्धेत पंढरीनाथ बोंडे याने ६५ किलो वजनी गटात तर गणेश भागडे याने ७० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत बेस्ट फिजिक २०२४ हा किताब पटकावला. ह्या स्पर्धेसाठी माजी विद्यार्थी रितेश भडांगे, क्रीडा संचालिका प्रा. प्रतिभा सकट यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मारुती कुलकर्णी, सचिव अश्विनीकुमार येवला व इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. प्रतिभा हिरे, महाविद्यालय समन्वयक डॉ. बाळू घुटे यांनी खेळाडूना अंतर्गत विभागीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.