इगतपुरीनामा न्यूज – घटकर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई व श्री जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात आदिवासी माता बहिणींना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. तारांगणपाडा, बिटूर्ली, कोरपगाव, गांगडवाडी, देवाचीवाडी, पिंपळगाव भटाटा, झापवस्ती, शिंदेवाडी, कावनई, खंबाळेवाडी, धार्णोली येथील ७०० कुटुंबाना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅंकेट व खजुर पॅकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आदी घटकर्णा ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष मनोज शहा, अश्विनभाई, नितीनभाई कोठारी, भाजपाचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव, श्री जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, आदिवासी नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्ष नीता वारघडे, शालू हंबीर, सोनी दोरे, जया भगत, शालेय पोषण आहार संघटनेचे सचिव संतोष भगत, शिक्षक देविदास हिंदोळे, जनसेवा प्रतिष्ठानचे सदस्य ताराचंद महाराज, संदीप रावत, नीता रावत, निखिल हांडोरे, गजानन गोफणे, अजय पुरोहित, सुधीर कांबळे, संदीप साहू,.सोनू चव्हाण, रहीम शाह, माणिक भरिंडवाल आदी उपस्थित होते. गत ५ वर्षापासून इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागात हिवाळ्यात उबदार कपडे व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात येत आहे अशी माहिती श्री जनसेवा प्रतिष्ठान इगतपुरीचे अध्यक्ष किरण फलटणकर यांनी दिली.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group