सानि फाऊंडेशनकडून चिंचलेखैरे येथील विद्यार्थ्यांना मोफत टी शर्टचे वाटप

इगतपुरीनामा न्यूज – सानि फाऊंडेशन नाशिक यांच्यातर्फे अतिदूर्गम भागातील चिंचलेखैरे येथील विद्यार्थ्यांना मोफत १७० टी शर्ट वाटप करण्यात आले. शिष्यवृतीसाठी १ हजाराचे ५ संच देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात आदर्श शाळा निर्माण केल्या आहेत. सानि फाउंडेशन नाशिकच्या मदतीने १७० विद्यार्थ्यांना रेड, ग्रीन, येलो, ब्ल्यू अशा प्रकारचे टी-शर्ट देऊन शाळेची समस्या सोडवली आहे. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्ष संध्या मिलखे, उपाध्यक्ष डॉ. किरण कुमावत, सदस्य निलेश सोनवणे, मीना कोंडार व मार्गदर्शक युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी डिव्हिजन मॅनेजर मंगेश मिलखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी सरपंच मंगाजी खडके, उपसरपंच भाऊ भुरबुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश भुरबुडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे, नामदेव धादवड, प्रशांत बांबळे, हौशीराम भगत, योगेश गवारी यांनी परिश्रम घेतले.शिक्षिका भाग्यश्री जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Similar Posts

error: Content is protected !!