
इगतपुरीनामा न्यूज – शेती व शेतकऱ्यांबद्दल जिव्हाळा असणारे राष्ट्रीय हिंदू संघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष घुगे कुटुंबात यंदाचा बैलपोळा सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात पार पडला. यावेळी सर्जाराजाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. कुटुंबाच्या वतीने बैलजोडीचे औक्षण केले. वडील बाबुराव घुगे,आई वत्सलाबाई प्रगतशील शेतकरी असून काळ्या आईची सेवा करीत आहे. त्यांच्या योग्य संस्कारातून या मातीची सेवा करण्याचे भाग्य लाभत असल्याचे त्यांचे सुपुत्र संतोष घुगे यांनी सांगितले. बैलगाडा शर्यतप्रेमी असलेले घुगे कुटुंबीय सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी बाबी बरोबरच शेतकरी कुंटुंबाची प्रथा आजही जोपासत आहे. यंदाच्या बैलपोळ्यानिमित्त आनंदाच्या वातावरणात घुगे पाटलांनी सर्जाराजाची वाजत गाजत मिरवणुक समर्थ नगर ज्ञानेश्वर नगर येथुन काढुन हनुमान मंदिर पाथर्डी गाव इथे सर्जा राजानी मारूती रायाला सलामी दिली. यावेळी घुगे कुंटुंबानी शेतकरी राजाच्या सुखासाठी मारुतीरायाला प्रार्थना केली. याप्रसंगी राष्ट्रीय हिंदू संघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष घुगे, संपूर्ण घुगे कुटुंब, पाथर्डीकर, समर्थ नगर, ज्ञानेश्वर नगर, नवले नगर, प्रशांत नगर,पाथर्डी फ़ाटा येथील नागरिक मोठ्या संख्येने सर्जाराजाची पुजा करण्यासाठी उपस्थित होते. कृषीप्रधान देशात बळीराजाला शेतीत मदत करून राबणाऱ्या सर्जाराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा करण्यात येतो. त्याच्यामुळेच शेतकरी शेतीत उत्पादन मिळवतात यापुढेही पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करणार असल्याचे राष्ट्रीय हिंदू संघाचे प्रदेशाध्यक्ष संतोष घुगे यांनी सांगितले. भाऊ दीपक घुगे, संतोष घुगे, गणेश घुगे, वहिनी रेखा घुगे, मीनाक्षी घुगे, आश्विनी घुगे, साक्षी घुगे, मल्हार घुगे, कृष्णा घुगे, समर्थ घुगे, श्रावण घुगे, तनुजा घुगे, समीक्षा घुगे, अक्षय आव्हाड, अक्षदा आव्हाड, अलका आव्हाड, वाळीबा आव्हाड, महेश केदार, शंकर जुन्नरे, सर्व मित्र परिवाराने मोठ्या उत्साहात बैल पोळा साजरा केला.