इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्व माजी नगरसेवक शिवाजी अप्पा चुंबळे आणि त्यांचे सुपुत्र अजिंक्य चुंबळे यांनी इगतपुरी विधानसभा महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. या दणदणीत पाठिंब्यामुळे इगतपुरी मतदारसंघातील निवडणुकीला रंग चढला आहे. शिवाजी अप्पा चुंभळे आणि अजिंक्य चुंबळे यांनी आमदार हिरामण खोसकर यांच्या विजयासाठी सक्रियतेने आपल्या कार्यकर्त्यांनाही काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर हे विकासाभिमुख व्यक्तिमत्व असून त्यांच्या विजयामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर हे दोन्हीही तालुके अधिकाधिक विकसित व्हायला मदत होणार आहे. यामुळेच हिरामण खोसकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. चुंभळे यांनी सांगितले. हिरामण खोसकर यांची ताकद चुंभळे यांच्या पाठिंब्यामुळे वाढली असल्याने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group