इगतपुरीनामा

नमस्कार, समस्त इगतपुरीकर!

कसे आहात सगळे? सध्या काळच असा आहे की कसलीच शाश्वती म्हणून नाही! अनेक समस्या काळाने आपल्यापुढे वाढून ठेवल्यात. या सगळ्यात तरुन जायचं असेल तर स्वतःच स्वतःची काळजी घेणं भाग आहे. आपण सगळे ती घेतोच, पण इथून पुढेही अधिक काटेकोरपणे काळजी घेऊ आणि लवकरच कोरोनापासून सुटका मिळवू!

आता थेट मुद्द्यावर!

बरेच जण विचारत आहेत की काय आहे हो हे इगतपुरीनामा पोर्टल? कशासाठी चालू केलंय? तर मंडळी या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे. कारण हे पोर्टल सुरू करण्याचं साधन जरी आम्ही असलो तरी साध्य तुम्ही आहात! आपलं इगतपुरीनामा म्हणजे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे.. होय, तुमचं हक्काचं व्यासपीठ!

प्रिंट मीडिया, समाज माध्यमं, टेलिव्हिजन अशी अनेक माध्यमं असतांना आपण या सगळ्यात कुठे असतो? हा प्रश्न कधी स्वतःला विचारलाय? आपण आहोत सुद्धा या सगळ्या माध्यमांमध्ये, पण फार मर्यादित स्वरूपात! मग आपली हक्काची एक जागा असायला काय हरकत आहे? तीच आपल्या तालुक्याची हक्काची जागा म्हणजे आपलं इगतपुरीनामा वेब पोर्टल!

सगळी प्रसार माध्यमं महत्वाची आहेतच, पण सध्या काळ आहे तो डिजिटल मीडियाचा! आपल्या हातातला मोबाईल हेच सगळ्यात सगळ्यात शक्तिशाली माध्यम होऊ पाहतंय, नव्हे, झालंच आहे! मग आपण तरी इथे का मागे राहायचं? म्हणूनच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अगदी बसल्या जागी आणि हक्काने बातम्या आणि माहिती उपलब्ध व्हावी यासाठी हा अट्टाहास!

तुमचे आशीर्वाद पाठीशी आहेत याची खात्री आहेच! आणि त्याच बळावर हे डिजिटल धाडस करण्याचा घाट घातलाय!

सोबत आहोत, सोबत राहू! आणि हक्काने व्यक्त होऊ!

तुमचा आशीर्वाद असाच हक्काने पाठीशी राहील या अपेक्षेसह..

Similar Posts

3 Comments

  1. avatar
    देविदास हिंदोळे says:

    खूप छान हा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे खऱ्या बातमीची विश्वासार्हता राहील. अफवा किंवा भीतीदायक अफवांना आळा बसायला यामुळे नक्कीच मदत होईल. त्याचप्रमाणे प्रिंट मीडियामध्ये संपूर्ण जिल्हाभरातील बातम्या असतात. त्यामुळे स्थानिक बातम्यांसाठी मर्यादा येतात. काही अशाही घटना असतात की तिथपर्यंत मोठी मीडिया पोहोचू शकत नाही. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नक्कीच हा हाती घेतलेला उपक्रम उपयुक्त आहे.👍

    माझ्या या *इगतपुरीनामा वेब पोर्टल* ला खूप खूप शुभेच्छा.

  2. avatar
    विकास काजळे says:

    खूप छान अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  3. avatar
    Deepak Maruti Chavan says:

    खूप छान पोर्टल आहे. वाचकांसह मलाही तात्काळ महत्वाच्या बातम्या मिळतील. आपण हे इगतपुरीनामा पोर्टल सुरू केल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा..!!

Leave a Reply

error: Content is protected !!