
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
इगतपुरी शहरात तळेगाव रोड भागातील 2 फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. भरदिवसा झालेल्या ह्या धाडसी चोरीमध्ये लाखो रुपयांचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याचे प्राथमिक माहितीमधून समजते. ही घटना सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान झाली. घरात कोणी नसल्याने फ्लॅटचे दरवाजे फोडून अर्ध्या तासात चोरटे पसार झाले आहेत. इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या आहेत. फिंगरप्रिंट एक्स्पर्ट टीम, क्राईम ब्रांचची टीमही हजर झाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करून पोबारा केलेल्या अज्ञात चोरट्यांचा शोध सुरु करण्यासाठी कार्यवाही सुरु झाली आहे. इगतपुरी येथील तळेगाव रोड भागातील वास्तू लक्झरीया या बिल्डिंग मधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समजते. इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला आहे.
विडिओ बातमी पहा : https://youtu.be/XO9Nze24Wuk

