इगतपुरीनामा न्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांचा विजय निश्चित आहे. मतदारसंघातील गावागावातुन त्यांना मतदार बंधू भगिनी भरभरून मतदान करणार आहेत. त्यांच्या कार्यामुळे स्वतः मतदारांनीच त्यांना निवडून देण्याचा निर्धार केला आहे. म्हणून सर्वांनी येत्या २० तारखेला घड्याळ निशाणीसमोरचे बटण दाबून हिरामण खोसकर यांना विजयी करावे प्रतिपादन राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष तथा नांदगाव सदो गटप्रमुख मदन कडू यांनी केले आहे. आमदार हिरामण खोसकर हे सामान्य माणसांसाठी कामाचे व्यक्तिमत्व आहे. पाच वर्षात विकासासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले आहेत. अजून विकासाच्या कामांसाठी हिरामण खोसकर यांना संधी मिळणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रवादी आणि महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते झटत आहेत. त्यानुसार मतदारसंघातील वातावरण हिरामण खोसकर यांच्या विजयासाठी अनुकूल निर्माण झालेले आहे. हिरामण खोसकर यांचा विजय नक्की असून आपले मत वाया घालवता विजयाचे साक्षीदार व्हा असेही मदन कडू यांनी म्हटले आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group