
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील भारत आदिवासी पक्षाचे अधिकृत उमेदवार कांतीलाल जाधव यांनी महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांना त्यांच्या समर्थकांसह बिनशर्त पाठिंबा घोषित केला आहे. आज कावनई येथे झालेल्या प्रचार सोहळ्यावेळी कांतीलाल जाधव यांनी स्वतः आपली भूमिका घोषित केली. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाला ठेकेदार आणि भांडवलदार प्रवृत्तीपासून वाचवण्यासाठी एकमेव पर्याय फक्त काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव आहेत. त्यांच्या आक्रमक शैलीतून निश्चितच मतदारसंघाची भरभराट होईल. म्हणून आम्ही सक्रियतेने सोबत राहून लकीभाऊ जाधव यांच्या विजयासाठी परिश्रम घेणार आहोत असेही कांतीलाल जाधव म्हणाले आहेत. लकीभाऊ जाधवयांना युवा वर्ग जेष्ठ नागरिक आणि माताभगिनी यांचा आशीर्वाद असून त्यांचा विजय नक्की आहे अशी माहिती इंदिरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामदास धांडे, तालुक्याचे स्टार प्रचारक निवृत्ती कातोरे यांनी यावेळी दिली.