श्रमजीवी संघटनेचा महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना पाठिंबा – जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात श्रमजीवी संघटनेची ताकद मोठी असून या संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. इगतपुरीचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर हे महायुतीचे इगतपुरीतील उमेदवार आहेत. मतदारसंघातील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिरामण खोसकर यांच्या घड्याळ निशाणीसमोरचे बटन दाबून त्यांनाच विजयी करण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे यांनी केले आहे. श्रमजीवी संघटनेने पाठिंबा जाहीर केल्याने महायुतीचे पारडे जाड झाले आहे. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी, प्रत्येकाचे विचार आहेत. ज्यांनी त्यांनी आपला विचार मांडावा, त्याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करावा. हे करीत असताना कुणी धार्मिक तेढ निर्माण होईल असे करू नये. या देशावर त्या सर्वांची समान मालकी आहे, ज्यांचे या देशावर प्रेम आहे. देश, देशाचे पवित्र संविधान, देशाचा विकास, देशाची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवा. असे सांगून मी आणि श्रमजीवी संघटनेने हाच विचार करून महायुतीचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे असे यापूर्वी घोषित केले आहे. त्यानुसार इगतपुरी मतदारसंघात महायुतीचे हिरामण खोसकर यांना निवडून आणण्यासाठी श्रमजीवी संघटना कार्यरत होईल असे संजय शिंदे यांनी सांगितले.

Similar Posts

error: Content is protected !!