रस्ता सुरक्षिततेसाठी महिंद्राचे योगदान ; रस्ता सुरक्षा प्रकल्पांतर्गत दरवर्षी विविध उपाययोजना

इगतपुरीनामा न्यूज, दि. 6 – अपघात होऊ नये म्हणून वेग वेगळे उपाययोजना शासन, सामाजिक संस्था, विविध कंपन्या नेहमीच राबवत असतात. परंतु सलग तिसऱ्या वर्षीही महिंद्रा व महिंद्रा लिमिटेड कंपनीच्या सीएसआर प्रकल प्रकल्पांतर्गत व युनाइटेड वे मुंबई यांचे माध्यमातून संयुक्तपणे रस्त्याच्या सुरक्षितेसाठी कार्य करणार असल्याचे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्लांटप्रमुख राजेश खानोलकर यांनी पिंप्री फाटा, इगतपुरी येथे सांगितले. रोजच आपण अपघात विषयी बातम्या ऐकतो वाचतो आणि असे अपघात होऊ नये म्हणून रस्त्यावर योग्य ठिकाणी वेळेत उपाययोजना करणे आवश्यक असल्याने
रस्ता सुरक्षा प्रकल्पांतर्गत दरवर्षी विविध उपाययोजना पिंप्री फाटा ते भावली डॅम रस्त्यावर राबवत आहेत हे स्पष्ट केले. यापुढेही रस्ता सुरक्षा बाबत कार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर यांनी मागील दोन वर्षात विविध उपक्रम राबविल्यामुळे अपघात संख्येत घट झाल्याचे त्यांचे भाषणात स्पष्ट केले.

इगतपुरीचे उपनगराध्यक्ष नईम खान यांनी मागील दोन वर्षा
पासून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून केलेल्या
कामाची स्तुती केली व इगतपुरी वासियांना यापुढेही ह्या उपक्रमांचा फायदा होऊन होणारे अपघात टळतील असे
उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहित केले. रस्ता सुरक्षा प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी युनाइटेड वे मुंबईचे सर्जेराव ढवळे यांनी यावर्षी राबविण्यात येणारे उपक्रम मेटल क्रॅश बॅरीअर, माहिती फलक, वळण दर्शविणारे फलक, योग्य ठिकाणी दगडाच्या भिंती, रोडमार्किंग आदी उपक्रम यावर्षी राबविण्यात येतील असे त्यांनी प्रकल्पाची ओळख करून देताना सूत्रसंचालनात सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी युनाइटेड वे मुंबईचे रवींद्र अरवेल यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे जयंत इंगळे, हरीष चौबे, भावली सरपंच दौलत भगत, पोलीस पाटील, विकास एन्टरप्राइजचे रॅम शिंदे, संदेश पवार युनाइटेड वे मुंबई व अन्य उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमानंतर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे फायर ऑफिसर हरीष चौबे व जयंत इंगळे ऍडमिन ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास १२५ महिंद्रा
अँड महिंद्रा कंपनी मधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
पिंप्री फाटा येथे रस्त्यावरील प्रवाशांना अपघात संदर्भात
माहिती पत्रके वाटून व ज्यांनी हेल्मेट किंवा सीट बेल्ट लावला आहे त्यांना गुलाब पुष्प देऊन प्रवास सुरक्षित करण्यासाठी प्रोत्साहित केले.

Similar Posts

error: Content is protected !!