
इगतपुरीनामा न्यूज – महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते यांच्या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. सभेपूर्वी इगतपुरीतुन महारॅली काढण्यात येणार असून घोटी शहराही महारॅली होणार आहे. इगतपुरी आणि घोटी शहरातील रॅलीत हजारो समर्थक सहभाग घेणार आहेत. उद्या दुपारी १ वाजता उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीचे सर्वच पदाधिकारी झपाटून कामाला लागले आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार हिरामण खोसकर यांनी इगतपुरी घोटी शहरांत महारॅली घेणार असल्याचे सांगत शक्तीप्रदर्शन करण्याचे आवाहन केले आहे.महारॅलीला आणि प्रचार सभेला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांनी सर्वांना सांगितले आहे.