इगतपुरीनामा न्यूज -इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील विकास गेल्या १५ वर्षापासुन रखडला असुन शेतीमाल आणि पिकाला योग्य भाव नाही. बेरोजगारी, पिण्याचा पाणी प्रश्न, आरोग्य, पर्यटनाचा विकास, जनतेचे मुलभुत हक्क व विकासाचा मुद्धा सोडवला गेला नाही. इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्तव मी अनिल गभाले जनसंवादी पक्षाकडून उमेदवारी करतोय. मतदारसंघात मी विकासगंगा आणायला कायम वचनबद्ध राहणार आहे. उद्या शुक्रवारी दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामदेवता घाटनदेवी मातेचा आशिर्वाद आणि घाटनदेवी मंदिरात श्रीफळ वाढवुन प्रचार रॅलीची सुरवात होणार आहे. प्रचार रॅलीचे रूपांतर खंबाळे येथे सभेत होणार आहे. संत निरंकारी हॉल येथे बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिष पेंदाम हे या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. तरी या जाहीर सभेसाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उमेदवार अनिल गभाले यांनी केले आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अनिल गभाले यांना प्रचंड मतांनी विजयी करा. निशाणी करवत समोरील बटन दाबुन मतदान करा अशी विनंती मतदार राजाला अनिल गभाले यांनी करून रॅली व सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group