
इगतपुरीनामा न्यूज – विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांच्या सूचनेप्रमाणे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलीस सक्रिय आहेत. यानुसार इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनने आचारसंहिता काळात मोठी कारवाई केल्याने वाडीवऱ्हे पोलिसांचे कौतुक केले जात आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा 3/25 आणि 4/25 प्रमाणे २ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये दोन तलवारी व एक गावठी कट्टा असे हत्यार हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, उपनिरीक्षक सुनिल बिराडे, माधुरी कंखरे , प्रविण काकड, अदिप पवार, हेमंत तुपलोंढे, खरोले, सोनवणे, येशी, लहामटे आदींच्या पथकाने केली आहे.